<p>जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य आणि वढोदा वन क्षेत्रात तीन वाघांचा अधिवास आहे. उत्तर महाराष्ट्रातील जंगलामध्ये अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आदी प्राण्याचा अधिवास आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अनिल अंजरकर यांनी दिली. </p><p>जागतिक वन्य प्राणीदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील प्राण्यांचा अधिवास, त्यांची जोपसना, उन्हाळ्यातील नियोजन या विषयांवर चर्चा केली.</p>