Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : अहो दिवाळी नव्हे हा तर येवल्यातील 'पतंगोत्सव'

Video : अहो दिवाळी नव्हे हा तर येवल्यातील ‘पतंगोत्सव’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येवला (Yeola) शहरातील पतंगोत्सवाची ख्याती देशभरात प्रसिद्ध आहे. येवल्याची खासियत म्हणजे पतंगोत्सवात तरुणाईसह अबालवृद्धपर्यंत सगळेच या सणात दंग होऊन जातात. शहरातील सर्व व्यवहार व्यापारीवर्गाकडून मकरसंक्रांतीच्या (Makarsankranti) दिवशी बंदच असतात.

- Advertisement -

काल (दि. १४) मकरसंक्रांतीच्या दिवशी येवल्यातील प्रत्येक घरात नागरिकांचा उत्साह दिसून आला. पतंगप्रेमींनी मोठ्या संख्येने घराच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला. अनेक घरांच्या गच्चीवर डीजेचा दणदणात पाहायला मिळाला.

अनेक लोकांनी सायंकाळी फटाके फोडून पतंगोत्सव साजरा केला. आज आम्ही आपल्यासाठी येवल्याच्या पतंगोत्सवाचा एक व्हिडीओ घेऊन आलोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याची प्रचीती नक्कीच येईल की ही दिवाळी (Diwali) नाही तर हा येवल्यातील पतंगोत्सवाचा सण आहे. व्हिडीओ एकदा नक्की पाहाच…

- Advertisment -

ताज्या बातम्या