नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

अख्खी तरुणाई ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असते. तो व्हॅलेंटाईन डे येऊन ठेपला आहे. व्हॅलेंटाईन वीक संपून रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे या दिवसांपासून सुरु झालेला हा प्रेमाचा प्रवास व्हॅलेंटाईन डे या दिवशी संपत असतो.

त्यामुळे हा संपूर्ण वीक नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. तर मग जाणून घेऊयात तरुणाई कडून कि, ते हा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहे.

व्हॅलेंटाइन डे'चा इतिहास

रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा.

संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.

फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाइन' असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली. रोमनमध्ये मध्य फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.