Video : आरोग्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा – डॉ.कुंभार्डे

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | टीम देशदूत

नाशिकपासून ७० किलोमीटरवरील मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी चांदवड तालुका (Chandwad Taluka) वसलेला आहे. तालुक्याच्या पूर्वेस नांदगाव तालुका, पश्चिमेस दिंडोरी तालुका, दक्षिणेस येवला व निफाड तालुका तसेच उत्तरेस मालेगाव व देवळा तालुका आहे. चांदवड तालुका हा ऐतिहासिक वारशाबरोबरच हॉटेल व्यवसायाने फुलला आहे. मात्र, शेती, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या सुटलेल्या नाहीत…

याबाबत माजी जि.प.सदस्य आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले की, पूर्वीपासून चांदवड हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात पाऊस (Rain) जरी जास्त प्रमाणात झाला तरी फेब्रुवारी-मार्चपर्यंत विहिरींनी तळ गाठलेला असतो. त्यामुळे तीन ते चार महिन्यात जी पिके निघतील तीच पिके शेतकरी घेतात. यामध्ये प्रामुख्याने कांद्याच्या (Onion) पिकाचा समावेश असतो. त्यात जर पाऊस चांगला असला तर गहू, हरभरा, यासारखी पिके घेतली जातात.

त्यासोबतच तालुक्यातील पूर्व भाग हा पूर्व दुष्काळी असून पश्चिम भागात पाण्याची धरणे असल्याने याठिकाणी पाण्याची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे या भागात द्राक्षाचे (Grapes) पिक घेतले जाते. तर झेंडूच्या फुलांचे उत्पादनही येथे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

तसेच चांदवड तालुक्यात आरोग्याच्या समस्या गंभीर असून हायवेलगत गाव असल्याने कधी-कधी याठिकाणी भीषण अपघात घडतात. त्यावेळी जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेले जाते. पंरतु, रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे जखमींवर तातडीने उपचार होत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो असे कुंभार्डे म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *