Video मराठा समाजाचे दुर्दैवच ; धुळ्यातूनही उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

Video मराठा समाजाचे दुर्दैवच ; धुळ्यातूनही उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

धुळे । प्रतिनिधी Dhule

मराठा समाजा बाबत आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत दुदैवी आहे, खरे तर हे मराठा समाजाचेच दुर्दैव असल्याच्या प्रतिक्रिया धुळ्यातून उमटल्या आहेत. वर्षो न वर्ष मराठा समाज हलाखीचे जीवन जगत असताना आज पर्यंत कोणत्याच राजकारण्यांनी या समाजाचा विचार केलेला नाही.

महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयन्त सुप्रीम कोर्टात टिकले नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात असल्याने त्यांनीच दमदार, मजबूत आरक्षण देऊन या समाजाच्या भावनांचा आदर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राने केले पण सुप्रीम ने हिराऊन घेतले, असे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी म्हटले आहे. तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय संघटक डॉ संजय पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्रातील 40 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजच्या भावनांचा विचार करून केंद्राने मजबूत व लवकर आरक्षण न दिल्यास हा समाज लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवेल, असे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राने केले पण सुप्रीम ने हिराऊन घेतले, असे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी म्हटले आहे. तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय संघटक डॉ संजय पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्रातील 40 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजच्या भावनांचा विचार करून केंद्राने मजबूत व लवकर आरक्षण न दिल्यास हा समाज लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवेल, असे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com