गिरणा नदी वाहू लागल्याने गिरणाकाठ आनंदीत

शेतकरी आनंदीत

गुढे, ता. भडगाव

मागील तीन वर्षांपासून पावसाळा ऋतू कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.पण मागील वर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने व गिरणा धरण शेवटच्या महिन्यात शंभर टक्के भरल्याने गिरणाकाठावर मोठ्याप्रमाणात खुशीत होता. यामुळे यावर्षी गिरणा धरण लाभक्षेत्रातील जामदा डावा-उजवा कालवा व पांझण कालव्याला रब्बी हंगामाला पाणी आर्वतन सुटले हे आर्वतनमुळे पुढील उन्हाळी हंगाम देखील घेतला गेला म्हणून शेतकरी आनंदीत झाले व इतर बागायती पिके देखील घेण्यात आली.

यानंतर या पावसाळ्या ऋतूत मृग नक्षत्रात जेमतेमच पाऊस झाला पण आद्रा नक्षत्रात पाचव्या दिवसापासून गांव परिसरात समाधानकारक पाऊस झाला त्यानंतर आठवडा भरापासून चांगला पाऊस होत असल्याने गांव परिसरातील छोटे-मोठे नाले खळखळून वाहू लागले. यानंतर कुंझर, कळमडू, अभोणे, पोहरे ,खेडगांव, जुवाडी, बहाळ परिसरात मुसळधार पावसामुळे खेडगांव येथील नारळी, उतळी नदीवरील 9 साखळी बंधारे ओव्हरफ्लो झाले आणि वाहू लागले आणि म्हसाल्डी नाला देखील मोठ्या प्रमाणात वाहिला म्हणून बहाळ गावापासून खाली गिरणा नदी चांगलीच वाहू लागली त्यात गुढे येथील लवण नाला कोरडी नाला देखील प्रवाहीत झाला आणि येथून नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होऊन वाहू लागल्याने गिरणाकाठ आनंदीत झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com