Video : 'लॉकडाउन काळात शेतीमालाला शासनाने बाजारपेठ निर्माण करुन द्यावी'

शेतकऱ्यांची मागणी

आरडगांव l वार्ताहर

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या खरबूज, टरबूज, कांदा, टोमॅटो पिकाची मोठी शेती आहे. मात्र सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे हा शेतीमाल विकायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात देखील शेतीमालाला शासनाने बाजारपेठ निर्माण करून द्यावी अशी मागणी टरबूज, खरबुज, टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधुन केली जात आहे.

करोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठो महाराष्ट्रत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. बाजार समित्या बंद असल्याने बाजारपेठा बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता माञ ऐन काढलीला आलेल्या शेती माल विकायचा कसा असा पेच शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

आरडगाव येथील शेतकरी दत्ताञय शेळके यांनी आपल्या एक एकर मधे टरबूज शेती केली त्यात. अंतरपिक म्हणून टोमॅटो पिक घेतले. माञ सर्वञ लाॅकडाऊन असल्याने या पिकाची विक्री करायची कोठे असा मोठा पेचप्रसंग त्यांच्यासमोर समोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या लॉकडाउन काळामध्ये शेतकऱ्यांना बाजारपेठ निर्माण करून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांमधुन केली जात आहे.

मी आरडगाव येथील माझ्या शेतामध्ये एक एकर टरबूज शेती केली. त्यात आंतरपीक म्हणून टोमॅटोचे पीक देखील घेतले. लॉकडाउन काळातदेखील शेती उपयोगी असणारे बरेच साहित्य हे चढ्या भावाने हे ठिकठिकाहुन उपलब्ध केले. सुमारे दीड लाख रुपये इतका खर्च या पिकाला झाला आहे. दोन्ही पिके हे उत्तम रित्या आले आहेत, आठ दिवसांमध्ये टरबूज काढणीला येईल आणि टोमॅटो देखील विक्रीला येईल मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात निघालेला हा माल विकायचा कसा हाच मोठा प्रश्न समोर आहे. त्यामुळे आधीच कर्ज काढून केलेली शेती आणखीनच कर्जाच्या खाईत लोटतीय काय अशी मोठी भीती मनामध्ये निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी देखील याच काळात लाॅकडाऊन असल्याने पिकांचे मोठे नुकसान झालं होते आणि आताही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने आता शेतकऱ्यांच्या भावना विचारत घेत या काळातही उत्तम बाजारपेठ निर्माण करून द्यावी.

दत्ताञय शेळके, शेतकरी आरडगाव

(व्हिडिओ स्टोरी - राजू आढाव)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com