Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedVideo Story : गोदामाई तुला कोरडेठाक बघून डोळे पाणावतात गं!

Video Story : गोदामाई तुला कोरडेठाक बघून डोळे पाणावतात गं!

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

नाशिक म्हटले कि, डोळ्यांसमोर येते ती जीवनवाहिनी ‘गोदावरी’ पिण्याचा पाण्यासाठी दैनंदिन जीवनासाठी गोदावरीचे स्थान महत्वपूर्ण आहे. इतकेच काय तर हि गोदामाई आहे म्हणू तर नाशिक आहे. तुम्ही आम्ही आहोत. शहरातील अर्थचर्क चालते ते या गोदावरीमुळेच. यासाठी गोदावरीचे स्थान महत्वपूर्ण आहे.

- Advertisement -

वर्षानुवर्षे खळखळून वाहणारी गोदावरी आज आपल्याला कोरडीठाक दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोदावरीवरील काँक्रिटीकरण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच व्हीक्टोरीया पुलाच्या खाली स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम देखील सुरु आहे. जेणे करून भविष्यात पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.

यासह गोदापार्क नूतनीकरणांसह गाळ काढण्याचे काम देखील दरम्यान सुरु आहे, परंतु गाळ काढण्याच्या नावा खाली ठेकेदाराकरून अवैध गौण खनिजाचा उपसा करत असल्याचा आरोप गोदा प्रेमींकडून केला जातात आहे. यासर्व कारणांसाठी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग तूर्तास थांबवण्यात आला असल्याने रामकुंड (गांधी तलाव) कोरडा ठाक पडलेला दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या