Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआंब्याचे वर्षातून एकदाच उत्पन्न म्हणून शेतकऱ्याने लढवली भन्नाट शक्कल; पाहा व्हिडीओ...

आंब्याचे वर्षातून एकदाच उत्पन्न म्हणून शेतकऱ्याने लढवली भन्नाट शक्कल; पाहा व्हिडीओ…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गावंधपाडा येथील शेतकरी यशवंत गावंदे यांनी आपल्या क्षेत्रात आंब्याची शेती केली आहे. आंब्याच्या शेतातील मोकळ्या जागेत त्यांनी खुरासणीचेदेखील पिक घेतले आहे.

- Advertisement -

या मागचा उद्देश सांगतांना तुषार बिरारी म्हणाले की, मोकळ्या जागेत तन वाढू नये आणि या जागेतून काही तरी उत्पन्न मिळावे याच उद्देशाने आम्ही ही संकल्पना राबवली आहे.

आंबा पिक हे वर्षातून एकदा येणारे पिक आहे. त्यामुळे आम्ही शेतीतील मोकळ्या जागेत खुरासणी घेण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी आंब्याची रोपे लावण्यात आली. मागील वर्षी पहिल्यांदा आंब्याचे उत्पन्न आम्हाला मिळाले.

केशर, राजापुरी, हापूस यांसारख्या वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाड आम्ही लावली आहेत. खुरासणीच्या बाबतीत बोलायचे झाले तर खुरासणी हे पावसाळी पिक आहे. मोकळ्या जागेत अनावश्यक गवत उगवू नये, यासाठी आम्ही खुरासणी आंतरपिक म्हणून घेतले आहे. शेतीत कुठलाही मल्चिंग पेपर न वापरता नैसर्गिक आच्छादनाचे काम खुरासणी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या