Video वेरूळ लेणी जवळील धबधबा खळखळला!

संदीप तिर्थपुरीकर

औरंगाबाद - aurangabad

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वेरूळ लेणी (Ellora Caves) वरील डोंगरदऱ्यातील धबधबे (Waterfalls) पावसाने खळाळून वाहत आहेत. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक (tourists) आणि ट्रेकर्सचा (Trekkers) ओघ वाढला आहे.

वेरूळ लेणी परिसर निसर्ग सौंदर्याची अलौकिक देण आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने वेरूळ नजिकच्या सीता न्हानी येथील धबधब्यासह लेणी परिसरातील धबधबे शतजलधारांनी कोसळत आहेत.

परिसरात खुलताबाद, म्हैसमाळ, सुलीभंजन, आदी पर्यटन स्थळ असून पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. वेरूळ लेणी येथील सीता न्हानी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी येथे मोठ्या संख्येत पर्यटक येतात. धबधब्याच्या दिशेने जाणारी वाट मात्र काहीशी बिकट आहे. ती पार करून हौशी पर्यटक दरवर्षी धबधब्याकडे पोहोचतात. सीता न्हानी धबधबा मनोहारी असला तरी पाणी मात्र खोल आहे. या ठिकाणी पर्यटक पाण्यात उतरण्याचा मोह आवरून धबधब्याचे मोहमयी नेत्रसुख घेण्यात धन्यता मानतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com