छोटुश्या गावात मोठस क्रीडा संकुल !; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक | Nashik

तालुक्यातील सैय्यद पिंप्री (Sayyad Pimpri) जवळील आडगाव (Adgaon) येथे एक तालुका क्रीडा संकुल (Taluka Sports Complex) आहे. या क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कब्बडी व हॉलीबॉल स्पर्धा खेळल्या जातात आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा देखील खेळण्यात आली आहे.

छोटुश्या गावात मोठस क्रीडा संकुल !; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट
Nashik Grampanchayat Election Result : दोन उमेदवारांना पडली समान मते अन् पुढे घडलं असं काही

मात्र, या तालुका क्रीडा संकुलाचे कामकाज अपूर्ण असल्याने येथील क्रीडाप्रेमींना स्वत:चे हक्काचे मैदान असूनही बाहेरच्या मैदानावर खेळण्यासाठी जावे लागते. हे क्रीडा संकुल सैय्यद पिंप्रीतील ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) जागेवर शासनाचा करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून उभारण्यात आले आहे.

छोटुश्या गावात मोठस क्रीडा संकुल !; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट
सिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा निकाल पाहा इथे

पंरतु, येथील क्रीडाप्रेमींना हे मैदान प्रत्यक्षात खेळण्यासाठी जरी उपलब्ध झाले असले तरी अजूनही निधी अभावी या क्रीडा संकुलाचे काम रखडलेले आहे.त्यामुळे क्रीडा संकुलासाठी शासनाने उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

छोटुश्या गावात मोठस क्रीडा संकुल !; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट
नाशिक बस अपघाताची...; छगन भुजबळांची लक्षवेधी सुचनेद्वारे सभागृहात मागणी

तसेच येथील स्थानिक खेळाडू (Player) कब्बडीच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर खेळत असल्याने या क्रीडा संकुलाचे कामकाज पूर्ण झाल्यास भविष्यात सैय्यद पिंप्री हे गाव कब्बडीचे गाव म्हणून ओळखले जाईल, अशी आशा स्थानिक व्यक्त करत आहेत.

छोटुश्या गावात मोठस क्रीडा संकुल !; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट
निफाड तालुका : 'हे' आहेत सरपंचपदाचे विजयी उमेदवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com