नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

संक्रातीला सुगडे पुजण्याची परंपरा आहे. पूर्वी नाशिकच्या कुंभारवाड्यात १५०-२०० घरे मातीकाम करायची आणि सुगडे बनवायची.

तथापि विविध कारणांमुळे या पारंपरिक व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अशक्य झाल्याची प्रतिक्रिया या परिसरात व्यक्त होत आहे.

यंदा फक्त क्षिरसागर यांच्याकडेच सुगडी बनत आहेत. ८५ वर्षांचे प्रभाकर क्षीरसागर सुगडी बनवत आहेत. त्यांनी या व्यवसायात पुढची पिढी का रमत नाही हेही सांगितले.