Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedअशी सजते गणेशमूर्ती !

अशी सजते गणेशमूर्ती !

अस्तगाव | वार्ताहर | Astagaon

मूर्तीकारांनी साकारलेल्या गणेशमूर्तींवर रंगीबेरंगी कुंदन बसविले तर मूर्ती अधिकच आकर्षक दिसतात. अस्तगाव येथील ज्वेलर्स दुकानच्या संचालिका नयना देवळालीकर या गणेश मूर्तीवर आकर्षक कुंदन लावण्याचा काम करत आहेत.

- Advertisement -

येथील मूर्तीकार आकर्षक श्रीगणेशाच्या मूर्ती बनवितात. त्या गणेशमूर्ती आकर्षक व जिवंतपणा दिसावा म्हणुन त्यांना रंगरंगोटी करतात. आता या मूर्ती चांगल्या आणि चमकदार दिसाव्यात म्हणून या मूर्ती कारखान्यांच्या जवळच देवळालीकर ज्वेलर्सच्या संचालिका नयना देवळालीकर यांचे दुकान आहे. त्या त्यावर कुंदन लावून चमकदार बनवतात. विजेंच्या दिव्याच्या प्रकाशात मूर्ती उठावदार दिसतात. एका मोठ्या मूर्तीला सजविण्यासाठी दोन दिवस लागतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या