Video : 'त्यांनी' जिद्दीने विस्तारला शेतीचा पट; 'पाहा' शेतकरी महिलेची यशोगाथा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतीकडे पाहण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनात आता बदल होत चालला आहे, हे आपल्याला गावाकडील काही उदाहरणांमधून सहज बघायला मिळतं आहे. शेतीसंस्कृतीत पारंपारिकदृष्ट्या घरातील पुरुष हा कर्ता आणि निर्णयक्षम समजला जायचा, मात्र या दुष्टीकोनाला काही कर्तबगार महिलांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे....

कारसूळ (ता. निफाड) येथील महिला शेतकरी प्रतिमा मोरे यांनी योग्य नियोजन, जिद्द आणि कष्टाने काळ्या मातीत सोनं पिकू शकतं आणि सरकारी नोकरीपेक्षाही जास्त मोबदला मिळू शकतो हे आपल्या कर्तृत्त्वातून दाखून दिले आहे.

स्वत: पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या प्रतिमा मोरेंनी नोकरीची अपेक्षा न ठेवता सासरची असलेले केवळ एक एकर शेती कसायला हाती घेतली. सुरुवातीच्या काळात तोटा सहन करावा लागला, मात्र खचून न जाता त्यांनी द्राक्ष शेतीचा मार्ग निवडला.

Video : 'त्यांनी' जिद्दीने विस्तारला शेतीचा पट; 'पाहा' शेतकरी महिलेची यशोगाथा
...जेव्हा महिला शेतकरी जपते मातीशी नाते; 'पाहा' व्हिडीओ

या शेतीत पहिल्याच बहारात मोठे यश आले. तिथून त्यांच्या यशाचा मार्ग विस्तीर्ण होत गेला. आज एक एकर शेतीत त्यांनी आणखी तीन एकर शेतीची भर घातली आहे. केवळ त्यांच्या कष्टातून आणि जिद्दीच्या माध्यमातून हे यश त्यांनी मिळाले आहे.

प्रतिमा मोरेंचे पती हे शिक्षक आहेत. त्यांना शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नसतानाही सर्व जबाबदारी प्रतिमा मोरे यांनी सांभाळली. शेतीसाठी लागणारे सर्व कौशल्य स्वत: आत्मसात केले. मग त्यामध्ये ट्रॅक्टर चालविणे असो, फवारणी करणे असो वा मग फळांची खुडणी असो सर्व काम त्या स्वतः करतात.

त्या केवळ एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर इतर महिलांनीही अशी यशस्वी शेती करावी म्हणून त्यांनी महिलांचा गटदेखील तयार केला आहे. मातीची गुणवत्ता टिकावी, पर्यावरणपूरक शेती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले असून त्यांची ही यशोगाथा शेती क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com