'अशी' आहे मोडाळे गावची सुसज्ज अभ्यासिका; पाहा व्हिडीओ
नाशिक | Nashik
जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ( Igatpuri Taluka) डोंगरदऱ्यात वसलेले मोडाळे (Modale) हे गाव होय.दहा वर्षांपूवी हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना भटकंती करावी लागत होती. मात्र, आज या गावाचा पूर्णपणे कायापालट झाला असून जिल्हाभरात आदर्श गाव (ideal village) म्हणून ओळख निर्माण झाली आहे...
गावात पहिली ते दहावीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुसज्ज अशी अभ्यासिका (Study Hall) साकारण्यात आली आहे. या अभ्यासिकेत गावासह परिसरातील मुले अभ्यासासाठी येत असून आयएस,आयपीएस, दर्जाचे अधिकारी याठिकाणी विद्यार्थ्यांना (Students) मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर गावात १५ बचतगट असून गावातील महिलांना (Women) स्वत:च्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.
तसेच अत्याधुनिक सुख सोयी, मुबलक पाणी पुरवठा, स्वतंत्र्य ग्रामपंचायत कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, ग्रीन जिम, लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल, पूर्ण गावात कॉंक्रीटीकरणाची रस्ते, पथदीप, सौरऊर्जेवर विद्युत पुरवठा अशा सर्वच सोयीसुविधा या गावात उपलब्ध झाल्या आहेत.