Video : 'अमुचा देश सुखाची खाण...'; विशेष बालकांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

नाशिक | Nashik

मुंबई नाका परिसरातील (Mumbai Naka Area) गायकवाड नगरस्थीत 'प्रयास लर्निग सेंटर' या विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) त्यांच्या विशेष विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती देतांना संस्थेच्या संस्थापिका रोहिणी वाघ यांनी सांगितले की, विशेष मुलांचा सामाजिक विकास व्हावा तसेच त्यांना रंग व विविध वेशभूषा कळाव्यात म्हणून प्रयास लर्निग सेंटरमध्ये (Prayas Learning Center) आम्ही सर्व सण व राष्ट्रीय दिवस आवर्जून साजरे करतो. एक विशेष शिक्षिका म्हणून मला कुतूहल वाटते की, विशेष मुलांना देखील तिरंग्यातील रंगांचे प्रचंड आकर्षण असते, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, प्रयास लर्निग संस्थेमार्फत विशेष गरजा असलेल्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना उपचारात्मक शिक्षण देऊन समाजातील त्यांचे स्थान उंचावण्यास प्रशिक्षण दिले जाते. तसेच यावेळी प्रभात फेरी काढण्यात आल्याने घोषणा व देशभक्तीपर गीतांनी गायकवाड नगरचा परिसर दुमदुमून गेला होता. तसेच विद्यार्थ्यांनी बासरी वादन करून सर्वांना थक्क केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी माधुरी दोशी, प्रियंका भालेराव, वैशाली बागुल, निमिषा पंजवाणी अजीझ खाटीक, लता नाडेकर,आकाश कांबळे, किरण कांबळे, किजंल वजा, रेणू पाल, या प्रयास लर्निग सेंटरच्या टीमने सुयोग्य नियोजन करून प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com