Video : मालेगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

दसरा (Dussehra) हा सनातन संस्कृतीत सीमोल्लंघनाचा म्हणजेच एक पाऊल पुढे जाण्याचा तसेच अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस आहे....

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) उत्सवांमध्ये सुद्धा विजयादशमीला (Vijayadashami) विशेष महत्त्व आहे कारण याच दिवशी नागपूरमध्ये आद्यसरसंघाचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती.

या दिवशी देशभर अनेक शहर व गावांत संघाचे संचलन संपन्न होते. आपल्या मालेगाव शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही संचलन पार पडले. शहराचे वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्यातून भगव्या ध्वजास प्रणाम करून संचलनाचे प्रस्थान झाले व रामसेतु-संगमेश्वर-दत्त मंदिर- आंबेडकर पूल-किडवाई रोड-नेहरू चौक-पाचकंदिल-टिळक रोड-तांबा काटा-किल्ला पोलीस ठाणे यामार्गे पुन्हा किल्यात येऊन संचलनाची सांगता झाली.

यावेळी संचलन मार्गावर नागरिक बंधु भगिनींनी रांगोळ्या काढून व स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करून त्याचे स्वागत केले तसेच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देउन उत्साह वाढवला.

या कार्यक्रमात जिल्हा संघचालक अशोक कांकरिया ,शहर संघचालक नितिन मुणोत, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, शहर कार्यवाह अतुल शिरोडे, सहकार्यवाह राकेश मालपुरे, कल्पेश कांकरिया, इतर जेष्ठ स्वयंसेवक, अन्य सामाजिक, राजकीय संघटनांचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रविवारी शहराच्या चारही भागांमध्ये शस्र पूजनाचे उत्सव पार पडले. त्यात शहरातील विविध मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com