Monday, April 29, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : नाशकात फटाका दुकानात लक्षणीय घट

व्हिडीओ स्टोरी : नाशकात फटाका दुकानात लक्षणीय घट

नाशिक | Nashik

दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी वाजविण्यात येणार्‍या फटाका आतीषबाजीला यंदा करोनाचा ब्रेक लागणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

करोनामुळे अनेक ठिकाणी अर्थिक खर्चाला मर्यादा आल्या असुन याच पार्श्‍वभूमीवर आलेल्या दिपावलीत फटाके वाजविण्यासाठी नागरिकांकडुन हात आखडते घेतले जाणार आहे.

याच पार्श्‍वभूमीवर शहरात यंदा फटाका दुकानात मोठी घट झाली आहे. दरम्यान शासनाकडुन फटाक्यावर बंदीचा विचार सुरू असल्याने फटाके विक्रेते चिंताक्रात बनले आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर करोना रुग्णांसह नागरिकांना श्‍वसनाचे आजार होऊ नये म्हणुन यंदा दिल्ली, कर्नाटक अशा राज्यांनी फटाक्यावर बंदी घातली असतांना आता महाराष्ट्रात देखील फटाका वाजविण्यावर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात राज्य शासनाकडुन निर्णय झालेला नसुन नागरिकांनीच फटाके वाजविण्यावर मर्यादा घालून केवळ दिवे लावत दिवाळी साजरी करावीत. फटाक्यामुळे प्रदुषण करु नये आणि श्‍वसनाचे विकार होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

या एकुणच पार्श्‍वभूमीवर नाशिक महापालिकेकडुन अलिकडेच शहरातील फटाका विक्री गाळ्यांचा लिलाव करण्यात आला असला तरी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लिलावाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

यात शहरातील सर्वाधिक गाळे असलेल्या गोल्फ क्लब मैदानालगत असलेल्या इदगाह मैदानावर असलेल्या ३५ – ४० गाळ्यात घट होऊन केवळ १० – १२ गाळेच याठिकाणी लागले आहे. अशीच स्थिती महापालिका क्षेत्रातील इतर गाळ्यांची आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विक्रीत मोठी घट होणार असल्याने फटाका विक्रेत्यांनी सावधगिरी बाळगत माल खरेदी केला आहे. यातच शासनाने चिनी फटाक्यावर बंदी घातली असल्याने आता विक्रेत्यांकडुन सावधगिरी बाळगली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या