Video बेंडाळे महिला महाविद्यालयात शॉर्ट फिल्म फेस्टिवल

जळगाव । प्रतिनिधी

डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (Dr. Annasaheb GD Bendale College) व अजिंठा फिल्म सोसायटी (Ajanta Film Society) , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिवल (Short Film Festival) अर्थात देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल येत्या 15 व 16 जानेवारी रोजी डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. अश्या स्वरुपाचा मोठा फिल्म फेस्टिवल जळगावात प्रथमच होत आहे, अशी माहिती डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांनी दिली.

यावेळी अनिल भोळे, विनीत जोशी, प्रा.डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आदी उपस्थित होते. प्रा.डॉ.गौरी राणे पुढे म्हणाल्या की, या फेस्टिवलमध्ये खान्देश व मराठवाडा परिक्षेत्रातुन लघुपट, डॉक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, निमेशन फिल्म या चार विभागात चित्रपट मागविले गेले असले तरीही उर्वरित महाराष्ट्रातून देखील चित्रपट या महोत्सवात आले आहेत.

जळगावमध्ये प्रथमच होत असलेल्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 60 चित्रपट आले आहेत यापैकी परीक्षांनी निवडलेल्या उत्तम 50 लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन दि.15 व 16 जानेवारी दरम्यान विविध दालनांमध्ये केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com