Video : लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; एसीबी तपासात धक्कादायक माहिती उघड

नाशिक | Nashik

निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५५ हजारांची लाच स्वीकारतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांच्यासह शिक्षण विभागाचे लिपिक नितीन जोशी यांना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईमुळे नाशिक महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली होती...

त्यानंतर काल एसीबीने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत अटक केली होती. यानंतर त्यांच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असता त्यात ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने, २ फ्लॅट आणि एक प्लॉट असे घबाड हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Sharmistha Gharge-Walawalkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Video : लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; एसीबी तपासात धक्कादायक माहिती उघड
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागले; महाराष्ट्रात 'असे' आहे नवीन दर

यावेळी वालावलकर म्हणाल्या की, तक्रारदार एका शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक होते. काही कारणांनी त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांनी शिक्षण लवादाकडे दाद मागितली असता बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. तरीही शैक्षणिक संस्था त्यांना कामावर पुन्हा रुजू करत नसल्याने त्यांना कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी ५० हजारांची लाच मागितले.

Video : लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; एसीबी तपासात धक्कादायक माहिती उघड
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

त्यानंतर त्यांचे लिपिक नितीन जोशी यांनी ते पत्र बनवून देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर नियमानुसार धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली. घर झडतीत ८५ लाख रुपयांची रोकड, ३२ तोळे सोने, तीन प्रॉपर्टीचे कागदपत्र, काही बँक अकाउंट्स सापडले आहेत. त्यांच्या राहत्या पुढील तपास पोलीस करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. फ्लॅटची किंमत तब्बल दिड कोटी असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

Video : लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; एसीबी तपासात धक्कादायक माहिती उघड
Train Accident : ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात! २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या छाप्यामुळे (Raid) नाशिक मनपात सुरु असलेल्या मोठमोठ्या व्यवहारांबद्दलच्या सुरस कथा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे यापेक्षाही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com