Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशिक-पुणे महामार्गावर 'द बर्निंग शिवशाही'चा थरार

Video : नाशिक-पुणे महामार्गावर ‘द बर्निंग शिवशाही’चा थरार

सिन्नर। नाशिक-पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात आज (दि.2) सकाळी 7.30 च्या सुमारास द बर्निग बसचा थरार बघायला मिळाला. सुदैवाने बसमधील 45 प्रवाशांना बसबाहेर काढण्यात चालकाला यश आले.

नाशिकहुन पुण्याच्या दिशेने शिवशाही क्रमांक एम. एच. 06/ बी डब्ल्यू 0640 जात असताना माळवाडी येथे अचानक बसच्या पाठीमागील बाजूने पेट घेतला.

- Advertisement -

ड्रायव्हरच्या असे लक्षात आले की गाडीच्या पाठीमागच्या बाजूला धूर निघत आहे. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडीत प्रवास करणाऱ्या 42 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सिन्नर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या