Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : संजय राऊत मालेगाव कोर्टात गैरहजर; नेमकं कारण काय?

Video : संजय राऊत मालेगाव कोर्टात गैरहजर; नेमकं कारण काय?

मालेगाव | प्रतिनिधी | Malgaon

पालकमंत्री दादा भुसेंवर (Dada Bhuse) घोटाळ्याचा आरोप करीत वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द करत बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी समन्स बजावूनदेखील आज शिवसेना नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित राहिले नाहीत. येत्या ४ नोव्हेंबर रोजी खा. राऊत न्यायालयात उपस्थित राहतील, असे प्रतिज्ञापत्र त्यांच्या वकिलांतर्फे देण्यात आल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी वकिलांतर्फे देण्यात आलेला अर्ज मंजूर करण्यात आला…

- Advertisement -

दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांच्यातर्फे बाजू मांडणाऱ्या अ‍ॅड. सुधीर अक्कर यांनी खा. संजय राऊत हे न्यायालयाने समन्स बजावून देखील हजर नसल्याने त्यांच्याविरूध्द पकड वॉरंट काढावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. येत्या ४ नोव्हेंबररोजी खा. राऊत न्यायालयात हजर न झाल्यास या अर्जावर न्यायालय निर्णय घेईल, अशी माहिती अॅड. अक्कर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून वीस हजार शिवसैनिक जाणार

गिरणा मोसम शुगर अ‍ॅग्रो कंपनी स्थापन करत सभासदांकडून जमा केलेल्या शेअर्समध्ये १७८ कोटींचा घोटाळ्याचा आरोप करीत वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द करत बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्याविरूध्द पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्यात न्यायालयातर्फे खा. राऊत यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे खा. राऊत उपस्थित राहतात का याकडे जनतेचे लक्ष लागले होते.

दरम्यान, खा. राऊत यांच्यातर्फे त्यांचे वकिल अ‍ॅड. काळे यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांच्याकडे मुंबई येथे शिवसेनेचा दसरा मेळावा असल्याने खा. राऊत हे आज न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही असा अर्ज केला मात्र न्या. संधू यांनी आरोपी न्यायालयात नसतांना कुठल्या कायद्याच्या आधारे तुम्ही हा अर्ज केला आहे ? असा प्रश्न केला. यावेळी दसरा मेळाव्यामुळेच खा. राऊत न्यायालयात हजर नाही परंतू येत्या ४ नोव्हेंबररोजी ते न्यायालयात हजर राहतील, असे प्रतिज्ञापत्र अ‍ॅड. काळे यांनी दिल्याने न्या. संधू यांनी त्यांचा अर्ज मान्य केला व ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहून जामीन घेण्याचे निर्देश दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

टोमॅटो भावात घसरण सुरूच; संतप्त शेतकर्‍याने दीड एकर पीक शेतातच सोडले

- Advertisment -

ताज्या बातम्या