Video Story : निर्जंतुकीकरण अंतिम टप्प्यात; तब्बल आठ महिन्यानंतर वाजणार शाळांची घंटा

Video Story : निर्जंतुकीकरण अंतिम टप्प्यात; तब्बल आठ महिन्यानंतर वाजणार शाळांची घंटा

नाशिक |प्रतिनिधी

कराेना संकट व लाॅकडाऊनमुळे गेल्या ८ महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. मात्र २३ नाेव्हेंबरपासून शाळा पुन्हा ५० टक्के क्षमतेने सुरू हाेत आहेत. तसे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

त्यानुसार नाशिकमधील सर्व महानगरपालिका, शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने शाळा स्वच्छ केल्या अाहेत. वर्ग खाेल्यांचे निर्जंतुकिकरण केले जात असून शाळांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कराेना निर्देशांचे पालन केले जाणार आहे.

शालेय कर्मचाऱ्यांकडून वर्ग खाेल्यांची स्वच्छता करण्या येत आहे. यासाठी काही शाळांनी समितीचीही स्थापना केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com