Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : ...अन् अध्यक्षपदी विराजमान झाले प्रा. दिलीप फडके

Video : …अन् अध्यक्षपदी विराजमान झाले प्रा. दिलीप फडके

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचा सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या (Sarvajanik Vachnalay) निवडणुकीची मतमोजणी सोमवारी मु. श. औरंगाबादकर सभागृहात (Aurangabadkar Hall) पार पडली. यात अध्यक्षपदी दिलीप फडके (Dilip Phadke) तर उपाध्यक्षपदी सुनील कुटे आणि वैद्य विक्रांत जाधव यांचा विजय झाला आहे. अध्यक्षपदासाठी फडके यांनी प्रतिस्पर्धी वसंत खैरनार यांचा 73 मतांनी पराभव केला तर उपाध्यक्ष पदासाठी वैद्य विक्रांत जाधव आणि सुनील कुटे यांनी प्रतिस्पर्धी मानसी देशमुख आणि दिलीप धोंडगे यांचा पराभव केला. आज (दि.१०) रोजी कार्यकारिणी मंडळाच्या इतर 15 सदस्यांची मतमोजणी होणार आहे….

- Advertisement -

दरम्यान, ग्रंथालय भूषण पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप फडके यांना 1 हजार 977 तर ग्रंथमित्र पॅनेलचे उमेदवार वसंत खैरनार (Vasant Khairnar) यांना 1 हजार 904 मते मिळाली. तर 24 मते बाद झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी असलेल्या मतमोजनीत ग्रंथालय भूषण पॅनेलचे उमेदवार वैद्य विक्रांत जाधव(Vaidy Vikrant Jadhav) यांना सर्वाधिक 2 हजार 27, सुनील कुटे यांना 1 हजार 987 तर ग्रंथमित्र पॅनेलचे उमेदवार दिलीप धोंडगे यांना 1 हजार 826 तर मानसी देशमुख यांना 1 हजार 690 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी असलेल्या मतमोजणीत 140 मते बाद झाली आहेत.

दरम्यान, अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी ग्रंथालय भूषण पॅनेलचे (Granthalay Bhushan Panel) उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कुटे हे कोल्हापूर येथे परिषदेसाठी गेले असल्याने ते मतमोजणीला उवस्थित राहू शकले नाही.

माझ्यासाठी ही स्पर्धा आज संपली आहे. माझे 50 वर्षांपासूनचे मित्र वसंतराव खैरनार माझे प्रतिस्पर्धी होते. आमची मैत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा उजेडात आलेली आहे. त्यांचे वडील हे माझ्या गुरुस्थानी आहेत. मला सावानाच्या विकासासाठी त्यांची साथ लागणार आहे. माझे मित्र आणि सावानाचे माजी अध्यक्ष दिवंगत भारद्वाज रहाळकर यांची प्रकर्षाने आठवण येत आहे.

दिलीप फडके, अध्यक्ष , सार्वजनिक वाचनालय, नाशिक

सावानाचा निवडणुकीत मतदान करून आणि योग्य व्यक्तींना न्याय दिला आहे. सभासदांनी दिलेल्या मतांचा आदर आम्ही करू. आणि यानिमित्ताने शब्द देतो की, सावाना येत्या काही दिवसात कात टाकेल.

– वैद्य विक्रांत जाधव उपाध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या