Video : नाशकात खा. राऊतांचा दौरा अन् सेनेत आयारामांच्या प्रवेशांची मालिका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका निवडणूक (Nashik NMC Election) आता अगदी जवळ आली आहे, मात्र त्याची तयारी गत दोन वर्षांपासून विविध राजकीय पक्षांसह प्रशासकीय पातळीवर सुरू होती. नाशिक मनपात सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘जोर’ लावला आहे. तर यामध्ये शिवसेना (Shivsena) सर्वात पुढे असल्याचे दिसत आहे. सेना नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) सतत नाशिक दौरे (Nashik Tour) करुन असून प्रत्येक दौर्‍यात ते भाजपला (BJP) धक्का देत असल्याचे दिसून येत आहे.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस अमित घुगे (Amit Ghuge) आणि शिवसेना नेते माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण (Sanjay Chavhan) यांच्याशी आमचे प्रतिनिधी फारूक पठाण यांनी बातचीत केली आहे. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com