<p><strong>जळगाव - Jalgaon</strong> </p><p>नवी दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथम मान मिळवून देणाऱ्या जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिने शनिवारी देशदूत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी तिचे वडील ॲड.हर्षल संत, आई अर्चना संत, भाऊ सार्थक संत, विजय डोहळे उपस्थित होते. मुख्य उपसंपादक डॉ.गोपी सोरडे यांनी स्वागत केले.</p>