Monday, April 29, 2024
Homeनाशिकमालेगावात 'ते' करतायेत तब्बल १० वर्षांपासून मत्स्यपालन; पाहा व्हिडीओ

मालेगावात ‘ते’ करतायेत तब्बल १० वर्षांपासून मत्स्यपालन; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

पारंपारिक शेतीसमोर अनेक संकटं उभी राहतात, कधी पाऊस (Rain) न झाल्याने तर कधी पाऊस जास्त झाल्यामुळे झालेले नुकसान. तसेच कधी उन्हाची तीव्रता वाढल्यावर तर कधी ऊन नसल्यावर झालेले नुकसान. अशा अनेक प्रश्नांनी पारंपारिक शेती (Farming) अडचणीत सापडत असल्याने शेतकरी नेहमी चिंताग्रस्त असतो.

- Advertisement -

मात्र, या शेतीक्षेत्राला नवा आयाम दिला आहे तो मालेगाव (Malegaon) तालुक्यातील पिंपळगाव येथील उपक्रमशील शेतकरी रविंद्र पवार यांनी. शेती केवळ पोट भरण्याचे साधन नसून तिला व्यवसायाचे स्वरूप दिले तर हीच शेती शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देते, हे पवार यांनी शेती व्यवसायातून दाखवून दिले असून देशदूतच्या टीमने जाणून घेतला आहे त्यांचा शेतीविषयीचा प्रागतिक दृष्टीकोन.

पवार हे आपल्या शेतात द्राक्ष, अॅपल बोर, डाळींब अशा फळ शेतीला प्राधान्य देत असून शेतात भले मोठे शेततळे उभारून त्यात मत्स्य शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. उन्हाळ्यामध्ये फळशेतीला पाण्याची उपलब्धता आणि मत्स्य पालन असा दुहेरी उपयोग शेततळ्याचा त्यांनी केला आहे. तसेच हमानातील बदल, रोगराईचे अरीष्ट्य या मत्स्यशेतीला भेडसावत नसल्यामुळे हक्काचा आर्थिक लाभ या मत्स्य (Fish) शेतीतून होतो म्हणून शेतकऱ्यांनी या पूरक व्यवसायाकडे वळायला हवे असा सल्लाही रवींद्र पवारांनी दिला आहे.

तर कोणत्याही ऋतूत आणि बाराही महिने या व्यवसायाला कुठलीही भीती नाही, बाजार स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध, कमी खर्चात उत्पन्नाची हमखास हमी देणारा हा व्यवसाय आहे म्हणून याकडे शेतकऱ्यांनी सकारात्मकपणे बघितले पाहिजे असेही पवार यांनी सांगितले. याशिवाय रत्नागिरीच्या (Ratnagiri) मत्स्य पालन प्रशिक्षण महाविद्यालयातून माहिती घेऊन पवार यांनी रोहू, कटला आणि कोंबडा अशा स्थानिक बाजारात मागणी असलेल्या माशांचे उत्पन्न यशस्वीरीत्त्या आपल्या शेततळ्यातून घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या