Exclusive Video : मुलगी न्हाई; संध्या माझा मुलगाच हाय…

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वडिलांच्या निधनानंतर आईने सांभाळले. आईच्या कष्टाचे चीज करत कडक सॅल्युट ठोकताना मनात आनंदाच्या भावना तीव्र होत होत्या. आईने वडिलांची उणीव भासू दिली नाही. आमच्या प्रत्येक गोष्टीत खंबीर उभी राहिली. आजचा हा दिवस तिचा आणि तिच्याचसाठी असे मनोगत पोलीस उपनिरीक्षक १२० व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभाच्या परेड कमांडर संध्याराणी देशमुख यांनी ‘देशदूत’शी बोलताना केले….

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मी प्रशिक्षणादरम्यान रोज स्वतःला मोटिव्हेट करत राहायचे. 2016 ला मी पदवी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय झाले. अभ्यास करत असताना देखील काही तरी मिळवायचाच या हेतूने अभ्यास केला आणि आता देखील प्रशिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण केले. माझा आवाज चांगला असल्याने परेड कमांडरची संधी मिळाली. केलेल्या कष्टांचे चीज झाले अन् मिळालेल्या संधीचे सोनं केलं असं संध्या सांगते…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *