Video : प्रभाग १४ : स्मार्ट नाशिकमधील वर्दळीचा शिंगाडा तलाव परिसर समस्यांच्या गर्तेत

Video : प्रभाग १४ : स्मार्ट नाशिकमधील वर्दळीचा शिंगाडा तलाव परिसर समस्यांच्या गर्तेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात ‘दुबई’ प्रभाग म्हणून प्रसिध्द प्रभाग क्रमांक 14 मध्ये (ward no 14) समतोल विकास झालेला नाही. त्याचप्रमाणे लहान बोळी, प्रचंड अतिक्रमण, उद्यानांची दुरावस्था, आरोग्य प्रश्न आदी समस्यांनी नागरीक त्रस्त आहे. ऐतिहासिक वाकडी बारव सुशोभीकरण व्हावे, प्रभागातील मार्ग मोठे व्हावे, अशी मागणी (demand) नागरिकांची आहे....

प्रभाग 14 हा मुस्लिम बहुल प्रभाग मानला जाते. येथील चार पैकी तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे (NCP) तर एक अपक्ष आहे. मुंबईनाका मागील बाजुने नानावली अमरधामरोड पर्यंत प्रभागाचा विस्तार आहे. काकेणीपुरा, चौक मंडई, इमाम शाही, सारडा सर्कल, शिंगाडा तलाव, वडाळानाका, मोठा राजवाडा, बागवानपुरा, आझाद चौक, काझीपुरा, मुल्तनापुरा, जोगवाडा, खळकाळी, चव्हाटा, शिवाजी चौक आदी परिसराचा समावेश या प्रभागात होतो.

प्रभागातील मुख्य समस्या

 • चौक मंडई, बागवानपुरासह काही भागात नियमित पाणी पुरावठा होत नाही. अनेक वेळा दुषीत पाणी येतो.

 • नियमित स्वच्छता होत नाही. अनेक ठिकाणी मुख्य रसत्यांवर कुंड्या तयार झाल्या तरी मनपाचे सेवक कचरा उचलत नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.

 • अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार फोफावले आहे.

 • मुख्य रसत्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

 • धूरफवारी, औषध फवारणी होत नाही. ठिकठिकाणी कचरा जमा होतो. यामुळे डासांची पैदास होते.

 • संपूर्ण प्रभागात अद्यावत असे एकही उद्यान नाही. नाना-नानी पार्क नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची विशेष सोय नाही.

 • प्रभागातील सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट बनली आहे. चौक मंडई परिसरात स्वच्छतागृह होते, मात्र त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याने ते तोडण्यात आली. त्याच प्रमाणे शौचालय देखील तोडण्यात आले आहे.

 • चौक मंडई येथील ऐतिहासिक वाकडी बाराव येथील कारंजाचे सुमारे 20 वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तो नशेखोरांचा अड्डा बनला आहे.

 • द्वारका परिसरात घाणीचे साम्राज्य कायम राहते.

 • कथडा भागातील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करण्याची मागणी आहे. भला मोठे उद्यान धूळखात पडून आहे.

 • मनपाचे डॉ. जाकीर हुसेन रुग्णायात सुविधांचा अभाव आहे. विविध प्रकाचे आधुनिक यंत्र लावण्यात आलेले नाही, जे आहेत त्यातील बरचशे बंद आहे.

 • नानावली, हेलबावडी, चौक मंडई, जोगवाडासह इतर भागात अत्यंत लहान गल्ल्यातही अतिक्रमण झाल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास अग्नीशामक दलाचे वाहन देखील जायला जागा नाही.

शिंगाडा तलाव परिसरात वर्षा इमारतीजवळ मनपाकडून उद्यान तयार करण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष आहे. साधी स्वच्छतादेखील होत नाही. उद्यान कचरा कुंडीत रुपांतर झाल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचत आहे. नगरसेवकांसह प्रशासनाचे लक्ष नाही.

- डॉ. धीरज शर्मा

जुने नाशिक जुनेच राहिले, मात्र इतर नाशिक मेट्रो सिटी झाले. मनपाने डॉ. जाकीर हुसैन रुग्णालय सुरू केले, मात्र अद्याप त्या ठिकाणी सोनोग्राफी मशिन लागले नाही, येथील मनपा शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. चारही नगरसेवकांनी या गंभीर विषयाकडे विशेष लक्ष दिले नाही. आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस भंगीर बनला आहे.

- बबलू शेख

Related Stories

No stories found.