काय पो छे! नाशकात मकर संक्रांतीची जय्यत तयारी; पाहा व्हिडीओ...
जुने नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रविवारी सुट्टीच्या दिवशी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2023) शहर परिसरात विशेषता जुने नाशिक भागात जय्यत तयारी झाली आहे. तरुणांनी परिसरातील टेरेसवर डीजे आणून ठेवले असून पतंगांच्या साठा करून ठेवला आहे....
त्याचप्रमाणे पर्यावरणाला पूरक अशा मांजा देखील बाजारातून आणला आहे. बंदी असलेला नायलॉन मांजा न वापरण्याच्या चंग तरुणांनी केला असल्यामुळे तो एक चांगला संदेश आहे.
मागील एक महिन्यांपासून शहर परिसरात विविध प्रकारचे पतंगे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्याप्रमाणे जुने नाशिकच्या दूध बाजार, त्र्यंबक दरवाजा पोलीस चौकी परिसर, भद्रकाली बाजार, मेन रोड, दहिपूल, खडकाळी आदी भागात पतंगाची दुकाने लावण्यात आलेली आहे.
नायलॉन मांजा बंदी असल्यामुळे पोलिसांची सतत कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर थेट तडीपारची देखील कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान नाशिक शहरातील गंगाघाट परिसर आदी भागातील टेरेसवर आज शनिवार असल्यामुळे देखील तरुणांनी मनसोक्त पतंग उडविण्याच आनंद घेतला. त्याचप्रमाणे आजपासूनच मकर संक्रांत सुरू झाले असे सांगितले. पतंग उडविण्याची मजाच काही और असते. मागील काही दिवसांपासून आकाशात सतत पतंग उडताना दिसत आहे.
मागील दोन वर्ष लॉकडाऊनमुळे मकर संक्रांतीचा सण पाहिजे तसा साजरी झालेला नव्हता, मात्र यंदा शनिवार रविवारच्या दिवशी सण आल्यामुळे आम्ही मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद घेत आहोत. आजपासूनच आम्ही पतंगे उडवत असून टेरेसवर डीजे लावला आहे. उद्या सकाळपासूनच आम्ही पतंग उडवणार आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची मजा काही औरच असते.
- संकेत पेखळे.