Friday, April 26, 2024
HomeUncategorizedबैलपोळा अहमदनगर जिल्ह्यात उत्साहात साजरा

बैलपोळा अहमदनगर जिल्ह्यात उत्साहात साजरा

बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा साथी समजल्या जाणाऱ्या बैलांचा सण अर्थात बैलपोळा आज अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षी खेड्यापाड्यात पोळ्याचा सण मोठया उत्साहात गावातील बैल सजवून ,वाजत गाजत त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरण पोळीचा नैवैद्य भरविला जातो आणि नंतर गावाच्या वेशीतून पोळा फोडला जातो.

- Advertisement -

म्हणजे इशारा केल्यानंतर ते एका मागे एक धावून सर्वात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी बैलांची एकत्र मिरवणूक काढण्याचीही प्रथा आहे.गावातील अबालवृद्ध त्याचा आनंद लुटतात.

यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांच्या बैलपोळा या सणावर कोरोनामुळे विरजण पसरले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी घरच्या घरी बैलपोळा साजरा केला. या उत्सवात घरातील सर्व कुटुंबीय सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या