Video : नाशिकच्या पाटलांचे पीएम मोदींकडून तोंडभर कौतुक; म्हणाले...

Video : नाशिकच्या पाटलांचे पीएम मोदींकडून तोंडभर कौतुक; म्हणाले...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील नदी प्रदुषणाविरोधात (river Pollution) लढा देणारे चंद्रकिशोर पाटील (Chandrakishore Patil) यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केले आहे...

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाशिकमधील चंद्रकिशोर पाटील यांचा स्वच्छतेप्रतीचा संकल्प अत्यंत कठोर आहे. चंद्रकिशोर पाटील हे गोदावरी नदीपाशी उभे राहतात आणि नागरिकांनी नदीत कचरा फेकू नये यासाठी जनजागृती करतात.

पाटील यांना कोणीही नदीत कचरा (Garbage) फेकताना दिसले तर ते त्या नागरिकाला त्वरित थांबवतात. या स्वच्छतेच्या कामासाठी चंद्रकिशोर पाटील हे आपला खूप वेळ खर्च करतात. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत ते नदीकाठी उभे राहून लोकांमध्ये जगजागृती करण्याचे काम करतात.

कुणी कचरा टाकायला आले तर ते तो कचरा संकलित करतात. संध्याकाळपर्यंत पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठतो. त्यांचे काम कौतुकास्पद असून प्रेरणादायीदेखील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.