Saturday, April 27, 2024
HomeजळगावVideo शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; भाव घसरल्याने दोन एकर कांद्याच्या शेतीवर फिरविला...

Video शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; भाव घसरल्याने दोन एकर कांद्याच्या शेतीवर फिरविला नांगर

दहिगाव ता.यावल वार्ताहर Yaval

येथून जवळच असलेल्या विरावली (Viravali) येथील (Farmers) शेतकऱ्याने कांदा (Onion) पिक कमी उत्पादित झाल्याने तसेच भाव घसरल्याने दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला.

- Advertisement -

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शासनावर शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. विरावली दहेगाव रस्त्यालगत विरावली शिवारातील विरावली येथील निळकंठ सदाशिव पाटील या शेतकऱ्याने कांदा उत्पादन कमी होत असल्याने तसेच कांद्याचे भाव घसरल्याने आज दि.30 रोजी दोन एकर कांद्याच्या शेतीवर नागर फिरवला व ढसाढसा रडला सर्व सामान्य शेतकरी वैतागले आहेत.

घेतलेले कर्ज यात भेटू शकत नाही एक एकर शेतीला 35 ते 40 हजार रुपये रोप खरेदी पासून तर खांदणी पर्यंत खर्च येतो आणि तो सुद्धा यात येऊ शकत नसल्याने शेतकरी वैतागला आहे सध्या कांद्याचा भाव दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये पर्यंत आह कार्यक्रम एवढा कमी भाव शेतकऱ्याला परवडत नसल्याने याने शेवटी दोन एकर शेतीवर नागर फिरून कांदा फेकून दिला वडसा ढसा रडला या प्रकाराने कांदा उत्पादक वैतागले आहेत सावकाराचे व संस्थांचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या