पिंपळगावमधील महिलेने 'अशी' फुलविली गच्चीवर बाग; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

भारत (India) हा जगात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी (Farmer) आपल्या शेतीत वर्षाला वेगवेगळी पिके (Crops) घेत असल्याने त्याचा उदरनिर्वाह सुरु आहे. अशातच आता जिल्ह्यातील पिंपळगाव येथील शैला मोरे (Shaila More) नावाच्या एका शेतकरी महिलेने चक्क घराच्या गच्चीवर कुंड्यांमध्ये फळ आणि पालेभाज्यांची बाग फुलविली आहे...

मोरे यांना ही संकल्पना करोनाच्या (Corona) काळात सुचली. सुरुवातीला त्यांच्या या संकल्पनेला घरातून विरोध झाला. मात्र, मोरे बाग फुलविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यांनी घराच्या गच्चीवर भाजीपाला पिकविण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी गच्चीवर टोमॅटो, कोबी, लसून, कांदा, शेवगा, वांगे, पपई, अंजीर, हरभरा, या पिकांची लागवड केली आहे. याशिवाय त्यांनी वड, पिंपळ, आंबा, झेंडूची फुले, गुलाब देखील लावली आहेत.

दरम्यान, यासर्व फळ आणि पालेभाज्यांना ड्रीपच्या माध्यमातून पाणी (Water) दिले जाते. तर वेळेवर खत आणि औषधे फवारली जात असल्याने फळा आणि पालेभाज्यांची योग्य निगा राखली जाते. तसेच गच्चीवर पिकविलेला भाजीपाला मोरे घरगुती खाण्यासाठी वापरतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com