Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo Story : 'या' भाजी बाजारात यापुढे तापमान तपासले जाणार, सॅनिटाईजदेखील होणार

Video Story : ‘या’ भाजी बाजारात यापुढे तापमान तपासले जाणार, सॅनिटाईजदेखील होणार

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाचा विळखा वाढत चालला आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासन वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसते आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील पवननगर भाजी मार्केट येथे गर्दी टाळण्यासाठी बाजाराच्या आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत…

- Advertisement -

केवळ एक रस्ता सुरु ठेवण्यात आला असून उद्यापासून याठिकाणी महापालिकेकडून भाजी बाजारात जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान चेक केले जाणार असून त्यांचे हात निर्जंतुक करण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेशशुल्क म्हणून एक तासांसाठी ५ रुपये ग्राहकाकडून घेण्यात येणार आहे. तसेच एक तासांपेक्षा अधिक वेळ असलेल्या ग्राहकाला महापालिकेच्या कर्मचार्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या