Video जळगाव शहरात शस्त्रधारी रॅपीड ॲक्शन फोर्सचे पथसंचलन

Video जळगाव शहरात शस्त्रधारी रॅपीड ॲक्शन फोर्सचे पथसंचलन

जळगाव - Jalgaon

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsava) पार्श्‍वभूमिवर जळगाव शहरात शहर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसर तसेच शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत आज शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस दलातर्फे (District Police Force) पथसंचलन पार पडले.

पथसंचलनात बाहेरील जिल्ह्यातील (Rapid Action Force) रॅपीड ॲक्शन फोर्सच्या तुकडीसह स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी अशा दीडशे कर्मचार्‍यांचा समावेश होता. शहरातील छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजता पथसंचलनाला सुरुवात झाली.

शाहूनगर, गोविंदा रिक्षास्टॉप, टॉवर चौक त्यानंतर शनिपेठ परिसरातील भिलपुरा चौक, रथचौक, सुभाष चौक, राजकमल चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पथसंचलनाचा समारोप झाला. पथसंचलनात शिस्तबध्द तसेच शस्त्रधारी रॅपीड ॲक्शनच्या फोर्सच्या तुकडीतील कर्मचार्‍यांनी लक्ष वेधले होते. तसेच पथसंचलनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड (Police Inspector Vijaykumar Thakurwad), शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्यासह कर्मचारी असे दीडशे कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com