Video आ.गिरीश महाजनांना दाखवा १० लाख बक्षीस मिळवा

जामनेर तालुका राष्ट्रवादीने केले जाहीर आवाहन
Video आ.गिरीश महाजनांना दाखवा १० लाख बक्षीस मिळवा

जामनेर - Jamner

जिल्ह्यासह जामनेर मतदार संघात कोरोनाचे रूग्ण वाढत असून अशा संकटसमयी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन पक्ष प्रचारासाठी मतदार संघाबाहेर आहेत. जनतेवर मोठे संकट आले असताना संकटमोचन कुठे आहेत, ते गेले कुठे गिरीश महाजनांना दाखवा १० लाख रू. बक्षीस मिळवा असे आवाहन करत राष्ट्रवादीने आज जामनेर येथे अनोखे आंदोलन केले.

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अनिस पहलवान, युवा शहराध्यक्ष विनोद माळी, सागर पाटील, दीपक राजपूत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com