वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत वसलं होतं नाशिकच्या कालिकेचं मंदिर...

नाशिक | Nashik

नाशिकचे ग्रामदैवत (Village deity) म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कालिका मंदिराला (Kalika Temple) शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे (Covid Outbreak) मंदिर काही दिवस बंद होते. मात्र आता करोनाचे नियम पाळत दर्शन सुरु करण्यात आले आहे. दररोज हजारो भाविक ऑनलाईन पास (E-Pass) घेऊन दर्शनाला येत आहेत. यंदा यात्रा बंद असल्यामुळे हा या परिसरात शुकशुकाट आहे. मात्र, कालिकेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत...

असा आहे कालिका मंदिराचा इतिहास...

नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसास पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला.

पुर्वीचे मंदिर १०x१० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता. मानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार करणारे साधन म्हणून मंदिराचा धार्मिक पीठासारखा उपयोग व्हावा ही मंदिरे उभारण्या मागील महत्वाची कल्पना आता सर्वमान्य ठरलेली आहे.

इतिहासकालीन भारतामध्ये सर्वठिकाणी मंदिरे बांधण्याची कल्पना झालेली असुन विशेषत; महाराष्ट्रामध्ये मराठे पेशवे सरदार राजे महाराजे यांनीही त्यांचा पुरस्कार करून ठिकठिकाणी मंदिरे, बारव, वाडे, धर्मशाळा, घाट हजारो लाखो रूपये खर्च करून केलेले आहे व आपली किर्ती अजरामर करून ठेवलेली आहे.

परंतु हल्ली त्यावेळची मंदिरे व धर्मशाळा, घाट आज जीर्ण झाल्यामुळे जीर्णोध्दारासाठी भाविकांची मनधरणी करु पाहत होती. व त्यामधुनच श्री कालिका देवीच्या मंदिराच्या जर्णोध्दाराचा उगम झाला. स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकलान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले.

स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरसाल यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.

Related Stories

No stories found.