Video : नाशिक सेंट्रल मार्केटमध्ये रूपांतरित होतेय भद्रकालीतील कुप्रसिद्ध व्हिडिओ गल्ली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुण्यातील 'तुळशीबाग बाजारपेठ' च्या धरतीवर नाशिक मधील ऐतिहासिक भद्रकाली परिसरात (Bhadrakali) नाशिक सेंट्रल मार्केट (Nashik Central Market) तयार व्हावे, अशी संकल्पना परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन मांडली आहे...

यासाठी छत्रपती सेनेच्या (Chhatrapati Sena) पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपासून महापालिकेपर्यंत सतत पाठपुरावा केला आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच परिसरासह शहराचा विकास व्हावा, या दृष्टीने नाशिक सेंट्रल मार्केट लवकरच लवकर तयार व्हावे, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.

2018 पासून याबाबत सतत पाठपुरावा घेण्यात येत होता तर 2020 मध्ये याठिकाणी नाशिक सेंटर मार्केटला मंजुरी मिळाली आहे. हा संपूर्ण परिसर मागील अनेक वर्षापासून व्हिडिओ गल्ली (Video Galli) व अनेक प्रकारचे गैर प्रकारांमुळे प्रसिद्ध होता.

त्याची जुनी ओळख पुसून नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन केला आहे. यासाठी छत्रपती सेनेकडून सर्व प्रकारची कागदोपत्री कारवाई करून पाठपुरावा सुरू आहे. अशी माहिती छत्रपती सेनेचे संस्थापक चेतन शेलार (Chetan Shelar), अध्यक्ष निलेश शेलार (Nilesh Shelar) यांनी दिली. नाशिक सेंट्रल मार्केट याची नोंदणी देखील झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com