Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo Story : ‘नो एन्ट्री’ मध्ये जाणार्‍या दुचाकीस्वारांंना आवरणार तरी कोण?

Video Story : ‘नो एन्ट्री’ मध्ये जाणार्‍या दुचाकीस्वारांंना आवरणार तरी कोण?

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा व मेनरोड भागाला जोडणारा सर्वात वर्दळीचा असलेला महात्मा गांधीरोड सिग्नलवर रेडक्रॉस सोसायटीकडे नो इंटरी असतांना सिग्नल सुरू असतांना दुचाकीस्वार बिनधास्तपणे उलट्या दिशेने शिरत आहे. या प्रकारातून मोठा अपघात होण्याची श्नयता असुन दुसर्‍यांच्या जीवीला धोका पोहचविणारा धोकादायक प्रकार पोलीस कर्मचारी असतांना आणि नसतांना घडत आहे. या नो इंटरीतून शिरणार्‍या दुचाकीस्वारांना कोण आवरणार ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे….

- Advertisement -

नाशिक शहरात पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर वाहतुक कोंडी फोडण्यासाठी विविध प्रकारे नियोजन सुरू केले आहे. यात सकाळ तीन तास व सायंकाळचे तीन तास कामावर जाण्यासाठी व घरी जाण्यासाठी वाहनांच्या गर्दीमुळे अनेक सिग्नलवर वाहतुक कोंडीचे प्रकार घडत असतांना आता याठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त झाल्याने ही कोंडी फोडण्याचे काम केले जात आहे.

असे असतांना शहरातील सर्वात वर्दळीचा सिग्नल म्हणुन संबोधला गेलेल्या महात्मा गांधी रोड सिग्नल जवळ नो इंटरीत दुचाकीस्वार शिरत असल्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनधारक व पादचारी यांना धोका पोहचण्याची श्नयता आहे.

या सिग्नलवरुन रेडक्रॉस सोसायटीकडे जाण्यास नो इंटरी असतांना परसराम सायखेडकर नाट्यगृह, महात्मा गांधीरोडकडुन येणारे दुचाकीस्वार सिग्नल सुरु असतांनाच रेडक्रॉस व रविवार कारंजा भागात बिनधास्त नो इंटरीत शिरत आहे. यामुळे समोरुन येणार्‍या वाहनधारकांसोबत अपघाताची श्नयता आहे. हा प्रकार पोलीसांच्या उपस्थित व पोलीस नसतांना सर्रास सुरू आहे. या बेशिस्त दुचाकीस्वारांना कोण शिस्त लावणार ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या