Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : लालपरी पूर्वपदावर; प्रत्येक आसनावर केली जाते फवारणी

व्हिडीओ स्टोरी : लालपरी पूर्वपदावर; प्रत्येक आसनावर केली जाते फवारणी

नाशिक | भारत पगारे

कराेना संकटामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाची बससेवा थांबिण्यात आली हाेती. मात्र, आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत २० ऑगस्टपासून अखेर आंतर जिल्हा बससेवा सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील ठक्कर बझार, जुने सीबीएस व महामार्ग बसस्थानकाहून धुळे, पुणे, चाळीसगाव, पेठ, सटाणा, येवला, नांदगावसह अन्य मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

या बस स्थांनकांवरून राेज ४० हून आधिक बसेसच्या फेऱ्या हाेत असून प्रवाशांचा प्रतिसाद वाढताे आहे. स्थानकांत आलेल्या बसेसचे सँनिटाईज केल्या जात आहेत.

दरम्यान, पाच महिन्यांनी बसेस सुरू झाल्याने आगार गजबजायला लागली आहेत. आजूबाजूच्या दुकानांतही वर्दळ वाढली आहे. यामुळे नक्कीच येथील छाेट्या दुकानदारांना नवसंजीवनी मिळणार आहे.

बससेवेच्या फेऱ्या व एकूण नियाेजनाविषयी ठक्कर बझार बसस्थानकाचे वाहतूक निरिक्षक परमेश्वर रावणकाेळे यांनी ‘देशदूत’शी बाेलतांना अधिक माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या