व्हिडीओ स्टोरी : ‘बाैद्धिक अपंग’ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

व्हिडीओ स्टोरी : ‘बाैद्धिक अपंग’ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कराेना संकटामुळे केलेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्व शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र, शिक्षणात खंड पडू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू असतांना बाैद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षणातून साक्षर केले जात हाेते.

शहरातील पंडित काॅलनीत असलेल्या प्रबाेधिनी विद्यामंदिरातील बाैद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रमेश वनीस व मानसोपचार तज्ञ डॉ राेहिणी अचवल यांच्या प्रयत्नाने झूम, गूगल मीट व यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्यात आले.

या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण, काैशल्य शिक्षण, शारीरीक शिक्षण, हस्तकला व चित्रकलेचे शिक्षण शिक्षकांकडून दिले जात आहे. विशेष करून राेजच या मुलांचा अभ्यासही घेतला जाताे. यासह पालकांशीही संवाद साधला जाताे.

या शाळेतील विद्यार्थी कशाप्रकारे घरबसल्या शिक्षणाचे धडे घेत आहेत? तसेच यामध्ये पालकांची कशी मदत होते आहे या विषयावर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत पगारे यांनी...

संवाद : भारत पगारे, नाशिक

व्हिडीओ एडिटिंग : दिनेश सोनवणे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com