Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलॉकडाऊननंतर गुलाबाला भावाची लाली

लॉकडाऊननंतर गुलाबाला भावाची लाली

नाशिक| सुधाकर शिंदे

नाशिक नगरीला गुलशनाबाद अशी पुरातन ओळख असुन गुलाबाचे शहर म्हणुन ही ओळख मिळाल्याचा इतिहास आहे.

- Advertisement -

याठिकाणी आजही फुलांचा राजा असलेल्या गुलाबाचे मोठे उत्पन्न घेतले जात आहे. करोनाच्या प्र्रकोपाचा मोठा फटका गुलाब उत्पादकांना बसला असुन यातून आता गुलाब उत्पादक शेतकरी सावरत आहे….

गेल्या फेब्रुवारी – मार्च महिन्यात टॉप सिक्रेट जातीच्या गुलाबांना चांगला भाव मिळत असल्याने हाच उद्देश ठेवून तीन महिने अगोदर लागवड केली होती. मात्र गुलाब काढणीची आणि करोना संकट येण्याची एकच वेळ झाल्यानंतर तयार झालेले गुलाब बांधावर फेकण्याची वेळ आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता कुठे वाहतुक सुरू झाल्यानंतर गुलाबाला चांगला भाव मिळत आहे. मात्र झालेले नुकसान भरुन निघेल का ? याची खात्री नाही.

– धनंजय ज्ञानेश्‍वर शिंदे, गुलाब उत्पादक शेतकरी, नाशिक

लॉकडाऊनमध्ये बसलेला अर्थिक फटका येणार्‍या ननरोत्रोत्सव, दसरा व दिवाळीत भरुन निघेल अशी आशा या शेतकर्‍यांना आहे.

नाशिक शहर परिसरात आणि जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यात गुलाबाची शेती केली जात असुन देशातील विविध भागात व परदेशातील बाजारपेठेत नाशिकचा गुलाब जातो. नाशिकची जशी द्राक्षे जगात पोहचतात, तशीच गुलाबाची फुले देखील जगाच्या बाजारपेठेत जातात.

मार्च महिन्यात देशात आलेल्या करोना संकटाता मोठा फटका गुलाब फुले उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. गत वर्षाच्या आक्टोंबर २०१ मध्ये गुलाबाची लागवड केल्यानंतर फेब्र्रुवारी- मार्च पासुन सुरू होणार्‍या लग्न समारंभासह उन्हाळ्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गुलाबाला मोठी मागणी असते.

यादृष्टीने नियोजन करीत गुलाब लागवड केलेल्या शेतकर्‍यांना करोनाने मोठा अर्थिक फटका दिला होता. मार्च अखेरीस देशभरात व नंतर जगातील अनेक भागात लॉकडाऊन झाले. एप्रिल एन्डच्या दरम्यान जिल्ह्यात तयार झालेले गुलाब फुले शेतकर्‍यांना तोडून फेकावे लागले. हातात आलेला घास करोनाने हिरावला.

मे – जुन महिन्यात लॉकडाऊन काहीअंशी उठल्यानंतर शेतकर्‍यांना गुलाब फुलांचा तुकडा माल विकावा लागला. १ रुपये किलो गुलाब विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. नंतर जुन महिन्यात गुलाबाला प्रति बंच (१ बंच मध्ये २२ फुले) ४० ते ६० रुपये असा भाव मिळू लागला आहे.

शहर व जिल्ह्यातील गुलाब दिल्ली, नागपुर, मुंबई अशा शहरातील विक्रेत्यांकडे जात आहे. अलिकडच्या काही दिवसात आंतरराज्यीय वाहतुक सुरु झाल्यानंतर आता सप्टेंबर पासुन चांगला भाव मिळू लागला आहे. आता पुढच्या दिवसात नवरात्र, दसरा व दिवाळी यात गुलाबांना चांगला भाव मिळावा व आमचे लॉकडाऊन काळातील नुकसान भरुन निघेल अशी आशा गुलाब उत्पादक शेतकर्‍यांची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या