Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedघरे बुडाली, संसार पाण्याखाली, नांदगाव शहरात चिखलाचे साम्राज्य

घरे बुडाली, संसार पाण्याखाली, नांदगाव शहरात चिखलाचे साम्राज्य

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव (Nandgaon) शहरात पावसाने मुसळधार हजेरी (Heavy Rain) लावली. ढगफुटीसारख्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाला. शहरातील नदीकाठी असलेल्या वस्तीत पाणी शिरले तर अनेकांचे काबाड कष्ट करून जमवलेली पुंजी वाहून गेली. अनेकांच्या घरात होत्याचे नव्हते झाले आहे. घात चिखलाच्या व्यतिरिक्त एक भांदेदेखील दिसून येत नाही. सद्यस्थितीत पाऊस ओसरला असला तरीदेखील शहरात प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे….

- Advertisement -

नांदगाव शहरातील दोन भागांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. नदीला आलेल्या पुरात वाहून आलेल्या पानवेलींचे साम्राज्य शहरत आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या घरातील अशी परिस्थितीअसल्याने एकवेळीची चूल कशी पेटवायची अशी भ्रांत आता त्यांना पडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या