Ground Report : राजानं कौळाणे नुसतं नावालाच, समस्यांची वानवा; पाहा खास रिपोर्ट...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर(Nashik City) वाडा संस्कृती जपणारे असेच आहे. वाडा संस्कृती काय होती? वाडे कधी बांधले असावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. जिल्ह्यातील कौळाणे (Kaulane Village Tal Malegaon Dist Nashik) या गावात याच वाडा संस्कृतीचा पुढील टप्पा येथे अनुभवायला मिळतो. वाड्याचे दरवाजाचे नक्षीकाम सज्जा अन् दुमली वाड्यातील दोन चौक, दगडी व लाकडी खांब, चौकांमधील तुळस, तळघर, वीसपंचवीस खोल्या अन् आजूबाजूची नक्षी डोळ्याचे पारणे फेडतात...

वाड्याच्या दरवाजे आणि खिडक्यांवरील नक्षीकाम अन् लाकडी काम अजबगजब असेच आहे. हा वाडा १८८५ च्या सुमारास बांधला गेल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. बडोदा संस्थानचे राजे इथेच लहानपणी खेळले बागडले. वाड्यामुळे गावाला ओळख आहे मात्र, गावाचा विकास खुंटल्याचे येथील नागरीक सांगतात. राजाचे गाव अशी ओळख असली तरीदेखील शासनदरबारी या गावाच्या समस्यांकडे कुणी लक्ष देत नाही.

तुम्ही राजाच्या गावाचे आहात तुम्हाला काय कमी? असे म्हणून वेळ मारून नेली जाते. मालेगाव शहर हाकेच्या अंतरावर असताना विधानसभेचा मतदार संघ मात्र इथला नांदगाव आहे. दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघात हे गाव येते. अनेक समस्यांची वानवा इथे आहे. पर्यटनस्थळ म्हणून इथे मान्यता मिळाली पाहिजे. मायबाप सरकारने आमच्या गावाची दखल घेतली पाहिजे. गावाची ओळख असलेल्या राजांचा सर्वोच्च गौरव झाला पाहिजे असेच येथील ग्रामस्थ सांगतात...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com