मोबाईलच्या की पॅडवरच उमगले स्वर तरंग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आताची मुलं आभासी जगात वावरू लागली आहेत. अधिक घरी पाहुणा आला तर त्याच्याशी किती बोलावं आणि काय काय बोलावं असे होत होते. आता मात्र घरी कुणीही येवो आपण आणि आपला मोबाईल एवढंच सध्याच्या तरुण पिढीला वाटते आहे. अशातच नाशिकच्या एका मुलाने मात्र चक्क मोबाईलच्या की पॅडवरच (Mobile Key Pad) सूर उमटवले आहेत. विश्वास बसणार नाही पण अठरा वर्षीय ईशान अमित देवडे (Ishan Deode) या कलावंताला स्मार्टफोनच्या की-पॅडमधून स्वर ऐकू येत आहेत....

त्याने राष्ट्रगीत, श्रीगणरायाची आरती (Ganpati Arti) की-पॅडवर सादर करीत अनोख्या कलेचे सादरीकरणच केले आहे. कुठल्याही कलावंताला त्या कलेचे विश्व सर्वत्र साद घालत असते, त्याचीच अनुभूती ईशानने की-पॅडमधून घडवलेल्या स्वराविष्कारातून सर्वांना मिळत आहे.

ईशान सध्या शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. लहान वयातच त्याला स्वरज्ञान असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. कुठलेही वाद्य त्याला आकर्षित करीत आले आहे. अनेक वर्षांपासून तो स्मार्टफोनच्या की-पॅडमध्ये स्वर ऐकू येतात असे म्हणत होता.

लॉकडाऊनच्या (Lockdown due to Covid 19) काळात संगीतविश्वात रमलेल्या ईशानने या की-पॅडवर लक्ष केंद्रित केले. त्याला पियानो, सिंथेसायझरचे नोटेशन माहीत होते. की-पॅडवर सहा स्वर असल्याची खात्री पटल्यानंतर त्याने मागील महिन्यात त्यावर राष्ट्रगीत सादर केले, त्याच्या इन्स्टाग्रामवरील (Instagram) या व्हिडीओने सर्वांचीच मने जिंकली. अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव ईशानवर होत आहे.

Related Stories

No stories found.