Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशकात महापुराची शक्यता; पुराची सद्यस्थिती थेट गंगेवरून

Video : नाशकात महापुराची शक्यता; पुराची सद्यस्थिती थेट गंगेवरून

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) विक्रमी १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात (Godavari River) केला जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur Dam catchment area) संततधार पाऊस सुरु असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे नाशिकला यंदाचा पहिला महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे….

- Advertisement -

गंगापूर धरणापाठोपाठ कश्यपी (Kashyapi) धरणातून 2 हजार 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर गौतमी गोदावरीतून (Gautami Godavari)0 1 हजार 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

होळकर पुलाखाली (Holkar bridge) 13 हजार 045 क्युसेक पाण्याचा विसर्ग दुपार बारा पर्यंत होता. यानंतर हा विसर्ग किमान २० ते २५ हजार क्युसेकपर्यंत दुपारी दोननंतर होणार आहे. नांदुर मधमेश्वर (Nandur Madhyameshwar) बंधारामधून सद्यस्थितीत 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

एकूणच पुराचे परिमाण असलेला दुतोंड्या मारुती बुडण्याच्या मार्गावर आहे. तर नारोशंकराची घंटा नाशिकच्या महापुराचे परिमाण आहे. सद्यस्थितीत घंटेजवळ पाणी नसले तरीही मंदिर मात्र अर्धे बुडाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची आवक गोदावरीत वाढली तर याठिकाणी महापूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असेच चित्र दिसते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या