Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedVideo Story : दिवाळीसाठी 'घरकुल'ची सजावट

Video Story : दिवाळीसाठी ‘घरकुल’ची सजावट

नाशिक | प्रतिनिधी

मानसिक अपंगत्व घेऊन जन्माला आलेल्या मुलींसाठी असणाऱ्या घरकुल परिवार संस्थेने नेहमीप्रमाणे दिवाळीची विशेष तयारी केली आहे.

- Advertisement -

संस्थेच्या मुली आकाश कंदील, पणत्या, मेणबत्या, दिवाळीच्या सजावटीचे साहित्य अत्यंत कलाकुसरीने बनवत आहेत.

नाशिक व पुणे जिल्ह्यातून त्यांना ऑडरही आल्या आहेत. अनेक जण दिवाळीला विशेष मुलींनी केलेले साहित्य वापरुन त्यांची दिवाळी अधिकच मधूर करत असतात.

विद्या फडके या परिवाराच्या संस्थापक सदस्य आहेत. त्या गेली ४० वर्षे या क्षेत्रात आहेत. २००६ मध्ये त्यांनी या संस्थेची निर्मिती केली. ५ मुलींपासून सुरु झालेल्या या संस्थेत आज ५५ मुली १५ ते ६० वयोगटातील आहेत.

व्हिडिओ स्टोरी : सतिश देवगिरे, प्रतिनिधी देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या