Video : कुणाच्या हट्टापायी गंगापूर धरणात १०० टक्के जलसाठा?

अचानक पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या व्यावसायिक, रहिवाशांचे हाल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणाचा (Gangapur Dam water level) जलसाठा ठरावी टक्क्यांची पाणीपातळी ओलांडली तर टप्प्याटप्प्याने पाणी गोदावरी नदीपात्रात (Godavari River) सोडले जाते. मात्र, गेल्या आठवड्यात धरण १०० टक्के भरल्यानंतर जलपूजन करण्यासाटी पाण्याचा विसर्ग करण्यात आला नसल्याने आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गंगापूरमधून सोडावे लागते आहे. असा आरोप गोदाप्रेमी देवांग जानी (Godapremi Devang Jani) यांनी देशदूतशी बोलताना केला....

ते म्हणाले, नियमाप्रमाणे ८० टक्के धरणात पाणीसाठा झाल्यानंतर टप्प्याटप्याने धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली जाते. असा नियम असताना महापालिकेला धरणातील पाण्याचे जलपूजन करावयाचे होते. त्यामुळेच प्रशासनाकडून धरण १०० टक्के जलसाठा होईपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही.

जर तेव्हाच पाणी सोडून दिले असते तर आज ही पूरपरिस्थिती आटोक्यात असती. येथील व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळदेखील उडाली नसती. नाशिकला हवामान विभागाने आधीच ऑरेंज आणि रेड झोनमध्ये टाकले आहे. गेल्या दोन दिवसांपसून गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव जाणवेल असे सांगण्यात येत होते. तरीही प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्याची तसदी घेतली नाही हे विशेष.

Related Stories

No stories found.