Video : करोनामुळे नातलग गमावले; टेन्शन घेऊ नका कलेक्टरांचे 'कार्ड' करणार मदत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेली दीड ते दोन वर्षे करोनाशी सर्वजण लढत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले. करोना संसर्गाने अनेक घरातील कर्ते दगावले आहेत. अशा परिस्थितीत मिशन वात्सल्य (Mission Watsalya) अंतर्गत मुख्य प्रवाहात या नागरिकांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत....(fight against corona outbreak)

यामध्ये अनेक बाबींचा अचूक अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार जवळपास ४५ ते ४६ योजना शोधण्यात आल्या असून त्याद्वारेदेखील अशा नागरिकांना मदत केली जात असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. (Collector Suraj Mandhare)

नाशिक शहरात जवळपास साडेचार हजार नागरिकांना ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासोबतच बरीच मुले ज्यांनी करोना काळात आईवडील गमावले आहेत. तसेच ही मुले सध्या नातेवाईकांकडे राहत आहेत अशा मुलांची नावेदेखील त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर लावण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली. यादरम्यान, आतापर्यत ३८ मुलामुलींची नावे मालमत्तेला वारस म्हणून जोडण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com